malikmodhi25.jpg
malikmodhi25.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपकडून भारतरत्नांचा अपमान..नवाब मलिकांचा आरोप..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नावे बदलण्याच्या धुंदीत भारतरत्न मिळालेल्या महापुरुषांचा अवमान भाजपकडून करण्यात येतोय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

अहमदाबादमध्ये भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यावर नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. 

जगातले सर्वात मोठे स्टेडियम मोटेरा अहमदाबाद येथे होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. परंतु भारतरत्न असलेल्या महापुरुषांची नावे बदलण्याची परंपरा भाजप सरकारने सुरू केली आहे, याचे दु:ख वाटते असे नवाब मलिक म्हणाले. 

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे त्या स्टेडियमचे नाव भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावाने ओळखले जात होते. आता ते नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. हरियाणामध्येही स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचे देण्यात आले आहे. नावे बदलण्याच्या धुंदीत भाजपसरकार सर्व हद पार करीत आहे. आतापर्यंत शहरांची नावे बदलली जात होती आता तर भारतरत्नांची नावे असलेली हॉस्पिटल आणि स्टेडियम बदलली जात आहेत ही दु:खाची बाब असून देशाची जनता कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.


हेही वाचा : अपघातात भाजप नेते मुनगंटीवार यांच्या बहिणीचा मृत्यू...
 
बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील मातोरी परिसरात भरधाव कार कंट्रोल न झाल्याने कार खोल अशा नाल्यात कोसळली. यामध्ये दोघा पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य हे भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नात्याने चुलत बहीण व भाऊजी आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे स्विफ्ट डिझायर कारमधून पुण्याच्या दिशेने जात होते. यावेळी कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मातोरी परिसरामध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार खोल अशा नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला आहे. तर यामध्ये विलास तगडपल्लेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ममता तगडपल्लेवार यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी चकलंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT